लोबो दाम्पत्याकडू जमिनीची कागदपत्रे सादर

0
12

विरोधी पक्षनेते मायकल लोबो व त्यांच्या पत्नी आमदार डिलायला लोबो यांनी काल म्हापसा पोलीस स्थानकावर जाऊन आपल्या जमिनीची कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली.

पर्रा येथे भराव घालून जमीन बुजवल्याप्रकरणी पोलिसांनी लोबो दाम्पत्याला समन्स पाठवले होते व जमिनीची कागदपत्रे सादर करण्याची सूचना त्यांना केली होती. या प्रकरणी लोबो दाम्पत्याविरुद्ध म्हापसा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे; मात्र आपण आपल्या जमिनीत जे बांधकाम केले आहे, त्याचा परवाना आपणाकडे असल्याचा दावा लोबोंनी केला होता.
त्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना समन्स पाठवताना परवान्यांची कागदपत्रे घेऊन पोलीस स्थानकात हजर राहण्यास सांगितले होते.