30 C
Panjim
Monday, April 19, 2021

लोटांगण

पणजीच्या महापौरपदी बाहुबली नेते बाबुश मोन्सेर्रात यांचे पुत्र रोहित मोन्सेर्रात यांना बसवण्यास निमूट होकार देऊन गेल्या महापालिका निवडणुकीत तीसपैकी पंचवीस जागा जिंकून विजयश्रीची माळ अलगद आणून देणार्‍या मोन्सेर्रात यांना त्या विजयाची भरघोस बक्षिसी देण्यास भारतीय जनता पक्ष मुकाटपणे राजी झाला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीतील पणजीतील विजयाचे शिल्पकार बाबुश हेच असल्याने त्यांना त्या कामगिरीची बक्षिसी हवी असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अगदी कोरोनाग्रस्त असले तरीही ते महापौरपदावरील आपल्या पुत्राचा हक्क सोडण्यास राजी झाले नाहीत आणि त्या दबावापोटी भाजपनेही मुकाटपणे त्या मागणीपुढे मान तुकवली आहे. रोहित यांना कोणताही राजकीय वा प्रशासकीय अनुभव नाही व ते प्रथमच नगरसेवकपदी निवडून आले आहेत, तरीही त्यांची थेट महापौरपदी वर्णी लावली गेली आहे.
राजकारणात हे असेच असते. ह्याच बाबुशनी एकेकाळी पर्रीकरांचे सरकार पाडले होते, आमदारांना स्वतःच्या ताळगावच्या बालेकिल्ल्यात नेऊन ठेवले होते. दुसर्‍या वेळीही विजय सरदेसाईंच्या मदतीने भाजप सरकार पाडण्यास ते प्रयत्नशील होते असा गौप्यस्फोट कॉंग्रेस निरीक्षक चेल्लाकुमारांनी केला होता. परंतु भाजपला आज ह्या सगळ्या पूर्वेतिहासाचे सोईस्कर विस्मरण झाले आहे. नेपाळी मुलीवरील बलात्कार प्रकरण, चौदा वर्षीय जर्मन कन्येवरील बांबोळीतील अत्याचार ह्या सगळ्या घटना पक्षाने सोईस्कररीत्या डोळ्यांआड करून संबंधितांना पावन करून सोडलेले दिसते. त्या दोन्ही प्रकरणांचा तपास कुठवर पोहोचला आहे हे गृहमंत्री असलेले राज्याचे मुख्यमंत्री जनतेला सांगतील काय?
भोवतालच्या राजकीय परिस्थितीचा अत्यंत सुनियोजितपणे वापर करून स्वतःची आणि कुटुंबीयांची राजकीय प्रतिष्ठापना करण्याचे मोन्सेर्रात यांचे कौशल्य कमालीचे आहे. अत्यंत चाणाक्ष राजकीय खेळी, वारा येईल तसे सूप धरण्यातले कसब आणि पैसा, कार्यकर्ते यांचे अखंड पाठीशी असलेले बळ या सगळ्याच्या मदतीने, राजकारणात कितीही भोवरे आले, कितीही गटांगळ्या खाव्या लागल्या, तरीही त्यातून वर येऊन किनारा गाठण्यात ते कधी कमी पडलेले नाहीत. त्यामुळे वेळोवेळी आपल्या राजकीय हितरक्षणाच्या दृष्टीने पक्ष, नेते, राजकीय घडामोडी यांचा अत्यंत अचूक वापर करून स्वतःचा मार्ग प्रशस्त करण्याचा त्यांचा हा जो गुण आहे त्याचे कौतुक करायलाच हवे. अशी माणसे राजकीय प्रवाहातून कधीही दूर फेकलीच जात नाहीत. जय – पराजय अशांसाठी तात्कालिक थांबे असतात. पराजयाचे रूपांतर विजयामध्ये कसे करायचे त्याचे अचूक ठोकताळे त्यांच्यापाशी सज्जच असतात आणि काळाची जराशी पाठ वळताच पुन्हा मुख्य प्रवाहात हे डेरेदाखलही होऊन जातात.
आपल्या पुत्राला महापौरपद मागण्यात बाबूश यांची मुळीच चूक नाही. तो त्यांचा हक्कच आहे, परंतु एवढा मोठा प्रबळ राजकीय पक्ष असलेला भाजपा ज्या प्रकारे निमूटपणे त्यांच्या मागणीमागे फरफटत वाहत चालला आहे ती खरोखर लाजीरवाणी बाब आहे. आज बाबुशमय झालेल्या भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आजवर पणजी आणि ताळगावात जिवाचे रान करून पक्षाचे उभे केलेले काम मातीमोल केले आहे याची कल्पना आज महापालिका निवडणुकीतील आयत्या विजयाच्या उन्मादात कदाचित येणार नाही, परंतु जेव्हा परिस्थिती वेगळी असेल, बाबुश यांनी एखादा वेगळा मार्ग चोखाळलेला असेल, तेव्हा हा जळजळीत प्रत्यय आल्याखेरीज राहणार नाही. शेवटी बाबुश काही भाजपच्या आजन्म आसर्‍याला आलेले नाहीत. हा प्रवासी पक्षी आहे आणि तो स्वतःच्या राजकीय सोईनुसारच पुढील मार्गक्रमणा करीत राहणार आहे.
खरे तर यांनीच स्वहितार्थ असे भस्मासुर चुचकारत मोठे केले. त्यांच्यासाठी पायघड्या काय अंथरल्या, ग्रेटर पणजी पीडीएसारखी कुरणे काय निर्माण केली, आजही केवळ त्यांच्या ‘विनेबिलिटी’ वर विसंबून त्यांच्या सर्व मागण्या निमूट मान्य केल्या जात आहेत. अर्थात कॉंग्रेसनेही काही वेगळे केले नव्हते. ज्या कॉंग्रेसने सहा वर्षांसाठी बाबुश यांची पक्षातून हकालपट्टी केली होती, त्यांनीच नंतर पणजीतून लढण्यासाठी त्यांचे पाय धरले होते. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो, परंतु प्रश्न उद्याचा वा परवाचा नाही. दूरच्या भविष्याचा आहे. त्यावेळी अशी मौकापरस्त माणसे पक्षासोबत असतील याची काय हमी आहे? बाबुश विरोधात भाजपमधील कथित बंडखोरांनी मध्ये आपल्या तलवारी परजल्या होत्या, परंतु शेवटी आपले राजकीय भवितव्य संपुष्टात येऊ नये यासाठी त्या मुकाट म्यानही करून टाकल्या. महापालिकेची सूत्रे मोन्सेर्रात पुत्राच्या हाती सोपविण्याचा अर्थ काय आहे हे भाजपला ठाऊक नाही असे नव्हे. परंतु केवळ सत्तेसाठी हे सगळे चालवून घेतले जाणार आहे असे दिसते. ‘स्मार्ट सिटी’ साठी ‘स्मार्ट’ नेत्याची मदत असल्यावर मग आणखी काय हवे?

STAY CONNECTED

849FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

साखळीचे लांच्छन!

साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांना अखेर त्या पदावरून काल पायउतार व्हावे लागले. त्यांच्याविरुद्ध माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी गटाने दाखल केलेला अविश्वास ठराव...

सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध ः मुख्यमंत्री

>> मडगावचे ईएसआय इस्पितळ आजपासून पुन्हा सुरू >> शुक्रवारी कोरोनाने ९२७ बाधित, सहाजणांचा मृत्यू राज्यातील कोरोना...

एक-दोन दिवसांत राज्यात कडक निर्बंध ः तानावडे

राज्यात वाढू लागलेल्या कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी येत्या एक दोन दिवसांत आवश्यक ते कडक निर्बंध घालण्यात येतील अशी माहिती काल भाजप प्रदेशाध्यक्ष...

साखळी नगराध्यक्षांवर अविश्‍वास ठराव संमत

>> पालिकेत सगलानी गटाचा विजय >> भाजपचे सहाही नगरसेवक गैरहजर साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्या विरोधात...

न्यायालयाने लोकशाही वाचवली : कामत

साखळी पालिकेत नगराध्यक्षांवरील अविश्‍वास ठरावात भाजप पुरस्कृत उमेदवाराचा जो दारुण पराभव शुक्रवारी झाला त्यावरून राज्यात भाजप सरकारचा शेवट जवळ आला असल्याचे संकेत...