सरकारच्या दबावामुळेच लोकायुक्त सुदर्शन रेड्डी यांनी राजीनामा दिला असून सरकारने ताबडतोब नव्या लोकायुक्ताची नेमणूक करावी अशी मागणी कॉंग्रेस प्रवक्ते सुदीप ताम्हणकर यांनी काल केली. या मागणीसाठी आपण २९ रोजी आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.
शिवोलीच्या सरपंचांकडून तेथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची छळणूक होत असून आपण त्याबाबत दक्षता खात्याकडे तक्रार केल्याचे ताम्हणकर म्हणाले. भाजपेतर कार्यकर्त्यांची दाखल्यासंदर्भात छळवणूक घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.