येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची वेळ दोन तास वाढविण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता हे मतदान सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत होणार आहे.
आतापर्यंत मतदानाची वेळ सकाळी ८ ते संध्या. ५ अशी होती. मतदारसंख्येत वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. नक्षली भागांमधील मतदान संपण्याच्या वेळेत बदल केला जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.