येत्या नोव्हेंबरमध्ये होणार्या लुसोफोनिया गेम्ससाठी देश-विदेशातून गोव्यात येणारे क्रीडापटू तसेच वेगवेगळ्या अधिकार्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठी वाहतूक खात्याने ५६० वाहने भाडेपट्टीवर घेण्यासाठी निविदा जारी केली आहे.
त्यात ४०० कार, ११० बसगाड्या व ५० जीपींचा समावेश आहे. सरकारने सध्या वरील गेम्सच्या आयोजनांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.