लुईझिन फालेरोंची फातोर्ड्यातून माघार

0
15

>> सेऊला वाझ यांनी भरला उमेदवारी अर्ज

माजी मुख्यमंत्री तथा तृणमूलचे राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांनी फातोर्डा मतदारसंघातून माघार घेऊन तृणमूल कॉंग्रेसची उमेदवारी तरुण वकील सेऊला वाझ यांना काल जाहीर केली. लगेचच वाझ यांनी फातोर्डा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी फालेरो यांनी पत्रकार परिषद घेवून वाझ यांना फातोर्ड्यातील उमेदवार म्हणून घोषित केले. यावेळी महुआ मोईत्रा उपस्थित होत्या.

आपणास सर्व मतदारसंघात तृणमूलच्या उमेदवारांसाठी प्रचार करावयाचा आहे. पक्षाचे कार्य राज्यभर वाढवायचे असल्याने आपण निवडणूक लढवू इच्छित नाही, ही बाब ममता बॅनर्जी यांना कळविली व त्यांनी होकार दिला, असे फालेरो यांनी सांगितले.