लिस्टन, सेरिटन भारतीय संघात

0
151

आघाडीपटू जेजे लालपेखलुआ व बचावपटू संदेश झिंगन यांचे दीर्घ कालावधीनंतर भारतीय फुटबॉल संघात पुनरागमन झाले आहे. संघाचे प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांनी कतारविरुद्ध २९ मार्च रोजी मायदेशात होणार्‍या ‘२०२० विश्‍वचषक क्वॉलिफायर’ सामन्यासाठी ४३ सदस्यीय संघाची काल गुरुवारी घोषणा केली. लालेंगमाविया, जेरी माविहिमिंगथांगा, जिकसन सिंग, लिस्टन कुलासो, प्रतीक चौधरी, शुभम सारंगी, रफिक अली सरदार, प्रभसुखन गिल, सुमीत राठी, सेरिटन फर्नांडिस, एडविन सिडनी वेन्सपॉल यांना प्रथमच सीनियर संघात समावेश करण्यात आला आहे. एफसी गोवा, एटीके, बंगळुरू एफसी व चेन्नईन एफसी क्लबशी संलग्नित २० खेळाडू १६ मार्च रोजी भारतीय संघासोबत जाणार आहेत.
आय लीगमधील एकाही खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. स्टिमॅक यांनी आय लीगमधील काही सामन्यांना उपस्थिती लावली होती. परंतु, एकही खेळाडू त्यांनी संभाव्यांमध्ये निवडलेला नाही.

४३ सदस्यीय भारतीय फुटबॉल संघ
गोलरक्षक ः अमरिंदर सिंग, सुभाशिष रॉय चौधरी, रफिक अली सरदार, गुरप्रीत सिंग संधू, विशाल कैथ, प्रभसुखन गिल.
बचावपटू ः प्रतीक प्रभाकर चौधरी, शुभम सारंगी, सुभाशिष बोस, नरेंदर, आदिल खान, संदेश झिंगन, प्रबीर दास, राहुल भेके, प्रीतम कोटल, निशू कुमार, सुमीत राठी, सेरिटन फर्नांडिस, मंदारराव देसाई.
मध्यरक्षक ः रॉवलिन बोर्जिस, अमरजीत सिंग, जिकसन सिंग, नंदकुमार सेकर, लालेंगमाविया, विनित राय, रेयनियर फर्नांडिस, निखिल पुजारी, जेरी माविहिमिंगथांगा, हालिचरण नार्झारे, साहल अब्दुल समद, एडविन वेन्सपॉल, ब्रेंडन फर्नांडिस, अनिरुद्ध थापा, उदांता सिंग, आशिक कुरुनियान, लालियानझुआला छांगटे, जाकिचंद सिंग, मायकल सुसाईराज.
आघाडीपटू ः फारुख चौधरी, जेजे लालपेखलुआ, लिस्टन कुलासो, सुनील छेत्री व मानवीर सिंग.