लाडली लक्ष्मी : शुभारंभी कार्यक्रमावर ४| लाख खर्च

0
61

ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांचा दावा 

लाडली लक्ष्मी योजना शुभारंभी कार्यक्रमाच्या आयोजनावर राज्य सरकारने तब्बल चार लाख पंचवीस हजार दोनशे चौपन्न रुपये खर्च केल्याचा दावा आयरिश रॉड्रिग्स यांनी केला आहे. ६ सप्टेंबर रोजी पहिल्या तुकडीतील लाभाथिर्र्ंना संमती पत्रे वितरित करण्यासाठी कला अकादमी सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांनी माहिती हक्क कायद्याखाली महिला आणि बाल विकास खात्याकडून ही माहिती मिळविली आहे.
खर्च करण्यात आलेल्या एकूण रक्कमेपैकी तीन लाख तेरा हजार आठशे तेहतीस रुपये उपस्थितांच्या अल्पोपहारासाठी तर पुष्पगुच्छ व हार तुरे यावर चौदा हजार नऊशे रुपये खर्च झाले. विविध भागातून लाभार्थी आणि नातेवाईकांची ने आण करण्यासाठी कदंब महामंडळाच्या बस सेवेवर अठ्ठेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ठ रुपये खर्च झाल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
वर्तमानपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया या माध्यमांद्वारे लाडली लक्ष्मी योजनेच्या जाहिरातबाजीवर सरकारने तेवीस लाख पाच हजार पस्तीस रुपये खर्च झाल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
या कार्यक्रमात पहिल्या तुकडीतील चारशे एकोणीस लाभार्थिंना संमती पत्रे वितरित करण्यात आली. त्यापैकी सहासष्ट (६६) कॅथोलिक तर आठ मुस्लीम समाजातील लाभार्थिंचा समावेश होता.