लाचप्रकरणी सुनील गुडलर, मोहम्मद हुसेन निलंबित

0
4

राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच प्रकरणात अटक केलेल्या कोकण रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर आणि हवालदार मोहम्मद हुसेन यांना सेवेतून निलंबित काल करण्यात आले आहेत.
एसीबीने बेळगाव येथील एका मटण व्यावसायिकाकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक गुडलर आणि हवालदार हुसेन यांना मंगळवारी रंगेहाथ पकडले होते. एसीबीच्या पथकाने काल निलंबित पोलीस निरीक्षक गुडलर आणि हवालदार हुसेन यांच्या निवासस्थानाची झडती घेतली.

निरीक्षकपदी राहुल नाईक
पोलीस मुख्यालयातून कोकण रेल्वे पोलीस स्थानकाच्या निरीक्षकपदी राहुल एस. नाईक यांची नियुक्ती काल केली आहे. कोकण रेल्वे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुनील गुडलर यांना लाच प्रकरणात अटक केल्यानंतर पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या रिक्त पदावर पोलीस निरीक्षक राहुल नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.