31 C
Panjim
Saturday, March 6, 2021

लळा.. जिव्हाळा.. शब्दच खोटे

  • ज. अ. रेडकर.
    (सांताक्रूझ)

सलग ३५ वर्षे ज्यांच्याशी संसार केला ते माधवराव राधाबाईंना असे अचानकपणे एकटीला टाकून देवाघरी निघून गेले होते. मुलगा-सून, मुलगी-जावई सगळी दूरदेशी आणि आपापल्या संसारात रमलेली. सोबत असायची ती टीव्ही आणि रेडिओ यांची!

नभोवाणीवर मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम चालू होता. स्वयंपाकघरात काम करता करता राधाबाई रेडिओवरची गाणी ऐकत होत्या. ‘मन झाले पांखरू पांखरू’ हे गीत संपले आणि सुधीर फडके यांच्या आवाजातील ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे, माश्या मासा खाई; कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही’ हे गीत सुरु झाले आणि राधाबाईंच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. ‘पिसे तनसडी काड्या जमवी, चिमणी बांधी कोटे, बळावता बळ पंखामधले पिल्लू उडून जाई; कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही’… या ओळी ऐकल्या आणि राधाबाईंचा कंठ दाटून आला. असे काय घडले होते राधाबाईंच्या आयुष्यात की सुधीर फडके यांचे ते गीत ऐकतांना त्यांचा कंठ दाटून आणि डोळे भरून आले?
माधवराव आणि राधाबाई हे मूळचे पुण्याचे जोडपे. माधवराव नोकरीच्या निमित्ताने गोव्यात आले. मरीन इंजिनीअर असलेल्या माधवरावांना गोव्यातील एका शिपिंग कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. राहायला चांगले घर आणि कार्यालयात जाण्या-येण्यासाठी गाडी त्यांना कंपनीने दिली होती. माधवराव आणि राधाबाईं दोघेही इथल्या वातावरणात रुळले. त्यांचा मित्र परिवार वाढला. खूप आनंदाचे दिवस होते ते. त्यांच्या मुलाचा आणि त्या पाठोपाठ मुलीचा जन्म इथलाच. मुलांचे बालपण आणि शिक्षण गोव्यातच झालेले. दोन्ही मुले अभ्यासात हुशार! प्रत्येक वर्गात त्यांनी पहिला नंबर कधी सोडला नाही. मुलगा रजनीकांत फुटबॉल प्रेमी तर मुलगी सुकेशा बुद्धिबळ वेडी. मुलं मोठी झाली. रजनीकांत संगणक इंजिनियर तर सुकेशा एमबीबीएस झाली. दोघांनीही आपापल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले.
इंजिनीअर व डॉक्टर झालेल्या प्रत्येकाचे असे एक स्वप्न असते की आपले पुढचे उच्च शिक्षण इंग्लंड अमेरिका यासारख्या प्रगत देशात व्हावे, तिथेच नोकरी करावी आणि खूप पैसा कमवावा आणि मग परत यावे. पंख फुटलेल्या पाखरांना आकाश थिटे वाटत असते. परदेशातील समृद्धी, तिथल्या सुख-सुविधा, तिथले वातावरण, तिथला स्वच्छंदीपणा याची भुरळ भारतीय मुलांना पडते आणि थोड्या काळासाठी गेलेली ही मुले तिथेच स्थाईक होतात..मागचे सगळे बंध तोडले जातात. रजनीकांत आणि सुकेशा यानादेखील वाटायचे की, निदान काही वर्षांसाठीतरी परदेशात जाण्याची संधी मिळावी. परंतु आईवडिलांना सोडून कसे जाणार आणि आई-वडील या गोष्टीला परवानगी देतील का? असा प्रश्न दोघांच्याही मनात यायचा. परंतु नियतीचा खेळ कुणाला कळत नाही. नियतीने प्रत्येकाचे मार्ग सुनिश्चित केलेले असतात. त्याप्रमाणेच सगळ्या घटना घडत असतात. रजनीकांत आणि सुकेशा हीदेखील याला अपवाद कशी ठरतील?
माधवराव आता निवृत्तीच्या जवळ पोहोचले होते. तत्पूर्वी त्यांना आपल्या दोन्ही मुलांचे विवाह करून आपले कर्तव्य पार पाडायचे होते. सुदैवाने मुलीचा- सुकेशाचा विवाह तिच्याबरोबर काम करणार्‍या डॉक्टर मित्राशीच झाला. विवाहानंतर दोघेही उच्च शिक्षणासाठी म्हणून लंडनला निघून गेली. पुढे शिक्षणक्रम पूर्ण होताच तिथेच स्थाईक झाली. तर मुलगा रजनीकांत याचा विवाह पणजीचे एक व्यावसायिक मेघनाथ कुंदे यांच्या सुस्वरूप मुलीशी- वंदनाशी करण्यात आला. वंदनाचे वडील खूप श्रीमंत होते. राजधानीच्या शहरात त्यांचे बार आणि रेस्टॉरंट होते, शिवाय त्यांचा बस व ट्रक वाहतुकीचा मोठा व्यवसाय होता. मिरामारच्या समुद्र किनार्‍याजवळ त्यांचा सुबक सुंदर बंगला होता. वंदना त्यांची लाडाची लेक! विवाहानंतर रजनीकांतचे भाग्य फळफळले. त्याला अमेरिकेतील बिल गेट्स यांच्या संगणक कंपनीत सिएटल या सायबर सिटीत भरभक्कम वेतनाची नोकरी मिळाली आणि तो वंदनासह अमेरिकेला निघून गेला.

माधवराव निवृत्त झाले. निवृत्तीतून मिळालेल्या काही रकमेतून त्यांनी वास्को येथेच एक सदनिका विकत घेतली. कारण निवृत्तीनंतर त्यांना कंपनीने दिलेली जागा सोडावी लागली होती. उरलेले पैसे त्यांनी एका राष्ट्रीय बँकेत कायम ठेव म्हणून ठेवले. त्यातून मिळणार्‍या व्याजातून त्यां दोघांचाही चरितार्थ उत्तम चालला होता. दोन्ही मुले दूरदेशी गेली याचा आनंद आणि विरह दोन्ही त्यांना जाणवत असे. परंतु आपल्यासाठी मुलांचे करीअर खराब होऊ नये म्हणून त्यांनी काळजावर दगड ठेऊन दोन्ही मुलांना त्यांच्या मर्जीनुसार परदेशी जाण्याची अनुमती दिली होती. रोज दोन्ही मुलांचे व्हिडीओ कॉंस्फरिंग कॉल यायचे, त्यामुळे मुले दूर असूनदेखील ती आपल्या जवळच आहेत असे त्यांना वाटत असे. दिवस असेच चालले होते. परंतु अचानक एके दिवशी माधवराव बाथरुम मध्ये गेले, तिथेच पाय घसरून पडले आणि पडता पडता त्यांचे डोके जोरदार समोरच्या भिंतीवर आदळले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. राधाबाईवर आकाशच कोसळले. मुले दूर देशी, अन्य नातेवाईक पुण्या-मुंबईला! कोरोना प्रकोपामुळे ना मुले परदेशातून येऊ शकत होती ना पुणे- मुंबईहून कोणी नातेवाईक! माधवारांचे मित्र आणि शेजारी यांनीच त्यांचा अंत्यविधी पार पाडला. राधाबाई अक्षरशः एकट्या पडल्या.

सलग ३५ वर्षे ज्यांच्याशी संसार केला ते माधवराव त्यांना असे अचानकपणे एकटीला टाकून देवाघरी निघून गेले होते. मुलगा-सून, मुलगी-जावई सगळी दूरदेशी आणि आपापल्या संसारात रमलेली. एकट्या राधाबाईना घर खायला उठायचे. रात्र तर अधिक भयाण वाटायची. दिवसा सखुबाई साफसफाई, धुणी-भांडी करायला यायची आणि निघून जायची. सोबत असायची ती टीव्ही आणि रेडिओ यांची! मन रमवण्याचा तोच एक उपाय आता त्यांच्यापाशी उरला होता. म्हणूनच रेडिओवरचे सुधीर फडके यांचे ते दर्दभरे गीत ऐकतांना राधाबाईंचा कंठ दाटून आला होता आणि डोळे अश्रुनी डबडबले होते. ‘सांगायची नाती सगळी, जो तो अपुले पाही| कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही’.. हे शब्द ऐकतांना आपल्या एकटेपणाची जाणीव राधाबाईंना तीव्रतेने होऊ लागली आणि त्यांनी एका हुंदक्यानिशी रेडियो बंद केला!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

आमोण्याची ज्ञानगंगा ः रामदास विद्यालय

डॉ. विठ्ठल ठाकूर त्या काळात पोर्तुगीज सरकारचे सर्व नियम सांभाळले जात असत. वर्षात सर्व परीक्षा योग्य ते परीक्षक...

शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य

चेतन कवळेकर(राज्यपुरस्कारप्राप्त शारीरिक शिक्षण शिक्षक) शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फक्त तंदुरुस्त शरीर एवढेच नव्हे, तर त्यात शारीरिक आणि भावनिक...

एक अगम्य चाहता… कधीच न भेटलेला!

ज. अ. रेडकर. मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती...

गूढ वाढले

जगातील आठव्या क्रमांकावरील आणि आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ ह्या सत्तावीस मजली आलिशान निवासस्थानापासून पाच - सहाशे मीटरवर...

सहा पालिकांसाठी ३२३ अर्ज वैध

>> पणजी मनपासाठी १०६ उमेदवार रिंगणात, आज स्पष्ट होणार अंतिम चित्र येत्या २० मार्च २०२१ रोजी राज्यात होणार्‍या पणजी...

ALSO IN THIS SECTION

आमोण्याची ज्ञानगंगा ः रामदास विद्यालय

डॉ. विठ्ठल ठाकूर त्या काळात पोर्तुगीज सरकारचे सर्व नियम सांभाळले जात असत. वर्षात सर्व परीक्षा योग्य ते परीक्षक...

शाळांमध्ये शारीरिक शिक्षण अनिवार्य

चेतन कवळेकर(राज्यपुरस्कारप्राप्त शारीरिक शिक्षण शिक्षक) शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे फक्त तंदुरुस्त शरीर एवढेच नव्हे, तर त्यात शारीरिक आणि भावनिक...

एक अगम्य चाहता… कधीच न भेटलेला!

ज. अ. रेडकर. मी माझ्या या अगम्य चाहत्याला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही. परंतु आपल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आलेली व्यक्ती...

विज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे

श्रेया काळे(पर्वरी) समस्या आहेत, आव्हानेही अनेक आहेत, पुढेही असतील पण विज्ञानाच्या आधारावर त्यावर मात करून आपले राष्ट्रवैभव टिकवू...

‘‘एक धागा सुखाचा…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) संपतराव आणि शारदाबाई यांना कर्ते-सवरते दोन पुत्र असताना आयुष्याच्या संध्यासमयी दुर्दैवाचे असे कठोर आघात सहन...