लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी पाच हजार पानी आरोपपत्र दाखल

0
23

लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी चौकशी करत असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) काल एकूण १४ आरोपींविरुद्ध लखनऊ न्यायालयात पाच हजार पानी आरोपपत्र दाखल केले.

या प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याला मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. घटना घडली, तेव्हा आशिष घटनास्थळी होता, असेही एसआयटीने नमूद केले आहे. त्यामुळे आशिष मिश्रा या प्रकरणात पुरता अडकला आहे. लखीमपूर खीरीतील तिकुनिया येथे ३ ऑक्टोबर रोजी हिंसाचार उसळला होता.

त्यात ४ शेतकर्‍यांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता. एसआयटीचे अधिकारी काल लोखंडी पेटीतून पाच हजार पानी आरोपपत्र घेऊन न्यायालयात पोहचले. आरोपपत्रात पोलिसांनी आशिष मिश्राचा आणखी एक नातेवाईक वीरेंद्र शुक्ला याच्यावरही आरोप ठेवले आहेत.