लखवी तीन महिने तुरुंगातच राहणार

0
74

दबावानंतर पाक सरकारची कारवाई
मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार झाकिऊर रेहमान लखवी याला काल न्यायालयीन जामीन मिळाल्यामुळे भारताने तीव्र हरकत नोंदविल्यानंतर आता पाकिस्तानने नमते घेतले असून लखवीला आणखी तीन महिने तुरुंगात ठेवण्यात येणार असल्याचे पाकिस्तानने जाहीर केले आहे.रावळपिंडीतील दहशतविरोधी न्यायालयाने काल लखवीला जामीन मंजूर केल्यानंतर त्याला तेथील अडियाला तुरुंगात स्थानबध्द करण्यात आले आहे. सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली ही कारवाई पाकिस्तान सरकारने केली आहे. तसेच या निर्णयाविरोधात पाकिस्तान सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.