23.5 C
Panjim
Thursday, December 3, 2020

लक्षणे असलेल्यांचीच यापुढे कोरोना चाचणी

>> बाहेरून येणार्‍यांना पुन्हा होम क्वारंटाईनचा पर्याय

राज्य सरकारने राज्यात विमान, रस्ता, रेल्वे मार्गाने प्रवेश करणार्‍या नागरिकांसाठीच्या प्रमाण कार्यवाही पद्धतीत (एसओपी) बदल केला असून नागरिकांना तीन पर्याय उपलब्ध केले आहेत. कोरोना विषाणूची थर्मल स्क्रिनिंगमध्ये प्राथमिक लक्षणे आढळून येणार्‍यांची कोविड चाचणी केली जाणार आहे. कोविड चाचणी विना १४ दिवस होम क्वारंटाईन, दोन हजार रुपये शुल्क भरून कोविड चाचणी व चाचणी अहवाल जाहीर होईपर्यंत सरकारी क्वारंटाईन सुविधेमध्ये राहणे, किंवा १४ दिवस सरकारी क्वारंटाईन सुविधेत राहणे, असे तीन पर्याय उपलब्ध केले आहेत. राज्यात प्रवेश करणार्‍या नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे. या नवीन एसओपीची येत्या १० जूनपासून अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यात येणार्‍या प्रवाशांच्या संख्येत विमान, रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर वाढ झाली आहे. तसेच रस्ता मार्गाने मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. राज्यात येणार्‍या प्रत्येकाची कोविड चाचणी केली जात असल्याने प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे चाचण्यांचे अहवाल जाहीर होण्यास दोन – तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे एसओपीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

पंच, नगरसेवकांवर
देखरेखीची जबाबदारी
होम क्वारंटाईन करण्यात येणार्‍या नागरिकांवर स्थानिक पंच, नगरसेवक, पंचायत सचिव, आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत देखरेख ठेवली जाणार आहे. पंचायत, नगरपालिका प्रशासनाकडून त्यासंबंधीचा आदेश जारी करून संबंधित पंच, नगरसेवकाला दिला जाणार आहे. होम क्वारंटाईन केलेली व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास सरकारी पेड क्वारंटाईन सुविधेमध्ये ठेवले जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात आढळून आलेल्या केवळ १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांवर कोविड केअर सेंटरमध्ये निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. शिरोडा येथे पहिले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथील नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. शिरोडा येथील लोकांसाठी आयुर्वेद महाविद्यालयात ओपीडी सुरू करण्यात आली आहे. राज्यात आणखी एक कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध करण्यावर विचार केला जात आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

मांगूर हिल वास्को येथील प्रतिबंधित क्षेत्रात आत्तापर्यंत १२०० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कोरोना चाचणीविना क्वारंटाईनचा पर्याय
नवीन एसओपीमध्ये कोरोना चाचणीविना क्वारंटाईनचा पर्याय देण्यात आला आहे. तथापि, कोविड चाचणी करणार्‍याला होम क्वारंटाईन केले जाणार नाही. तर, सरकारी पेड क्वारंटाईन सुविधेमध्ये अहवाल जाहीर होईपर्यंत राहावे लागणार आहे. राज्यात प्रवेश करणार्‍यची तपासणी नाका, विमानतळ, रेल्वे स्टेशनवर थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे. या स्क्रिनिंगमध्ये कोविडची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास कोविड चाचणी केली जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

खाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री

>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...

शाळा सुरू करताना…

विलास सतरकर(मुख्याध्यापक, डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, बांबोळी) गोव्यात ऑनलाईन शिक्षण व्यवस्थितपणे चालू आहे आणि या कोविडच्या पार्श्‍वभूमीवर...

पीएमसी बँकेच्या ठेवीदारांची परवड

शशांक मो. गुळगुळे गेल्या १४ महिन्यांत पीएमसी बँकेकडून मिळालेल्या ‘शॉक’ने पाचजण मृत्युमुखी पडले, तर त्यांपैकी चार जणांनी जगण्यासाठी...

दुरपती

पौर्णिमा केरकर आम्ही घरी परतण्यासाठी उठलो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. मी तिला तिचं नाव विचारलं… तिनं सांगितलं...

कार्तिकातला दीपराग

मीना समुद्र आकाशातल्या नक्षत्रतारका सोनेरी वेष घालून पणतीच्या टोकावर विराजमान झाल्या आणि खाली यायला तयार नसलेल्या चांदण्यांना टुक्‌टुक्...

ALSO IN THIS SECTION

खाणप्रश्‍नी केंद्र सरकार सकारात्मक ः मुख्यमंत्री

>> ह्या आठवड्यात दोन वेळा होणार बैठका गोव्यातील बंद पडलेला खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याची...

कोविडमुळे नुकसान झालेल्यांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करा

>> म्हापशातील बैठकीत दिगंबर कामत यांची मागणी कोविड काळात राज्य सरकार गोवा मुक्ती दिनाला साठ वर्षे पूर्ण होणार असल्याने...

नोकरभरतीसाठी अर्थसंकल्पात सरकारची तरतूद नाही ः कॉंग्रेस

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दहा हजार नोकर्‍या देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, नोकर्‍या देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केलेली नाही. आगामी निवडणुकीत...

आंदोलक शेतकर्‍यांनी फेटाळला अमित शहांचा चर्चेचा प्रस्ताव

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या पंजाब आणि हरयाणातील शेतकर्‍यांचे काल चौथ्या दिवशीही दिल्ली सीमेवर आंदोलन सुरू होते. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

पेडण्यात ३५ लाखांचे अमली पदार्थ जप्त

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने शनिवारी मध्यरात्री पेडणे तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकत अमली पदार्थ विक्रीमध्ये गुंतलेल्या ३ जणांना अटक केली. यावेळी...