रोहित टी-२०त द्विशतक नोंदवू शकतो ः ब्राव्हो

0
131

 

भारताचा विस्फोटक सलामीवर रोहित शर्मा टी-२०मध्ये द्विशतक नोंदवू शकतो अशी शक्यता वेस्ट इंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्‌वेन ब्राव्होने व्यक्त केली.

टी-२०मध्ये आत्तापर्यंत एकाही खेळाडूला शतकी कामगिरी करता आलेली नाही आहे. परंतु अशी कामगिरी होऊ शकते आणि ती करण्याची क्षमता भारताच्या रोहितकडे असल्याचे ब्राव्होने ईएसपीएन क्रिकइन्फोच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

खरे पहिल्यास टीम इंडियाचा विस्फोटक सलामीवर असलेला रोहित शर्मा हा मर्यादित षट्‌कांच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त फलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत ४ शतके नोंदविलेली आहेत. त्याने २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध ४३ चेंडूत ११८ धावांची शतकी खेळी केली होती. तसेच वनडे क्रिकेटमध्येही त्याने आत्तापर्यंत तीन द्विशतके नोंदविलेली आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. ही क्रिकेटच्या सर्वांत छोट्या क्रिकेट प्रकारातील रोहितची सर्वोत्तम धावसंख्या आहे.