रोनाल्डो सर्वोत्तम फुटबॉलपटू

0
72

ख्रिस्तियानो रोनाल्डोने लियोनेल मेस्सीला पुन्हा एकदा मागे टाकत सर्वश्रेष्ठ ङ्गुटबॉलपटूचा किताब पटकावला आहे. रियल माद्रिद ङ्गुटबॉल क्लबमधील पोर्तुगालचा स्टार खेळाडू रोनाल्डोला २०१७ ङ्गिङ्गाचा सर्वोत्त’ ङ्गुटबॉलपटूचा पुरस्कार काल देण्यात आला.

रोनाल्डोने एकूण पाच वेळा हा किताब पटकावला आहे. या किताबासाठी रोनाल्डोची टक्कर बार्सिलोना ङ्गुटबॉल क्लबमधील अर्जेंटिनाचा खेळाडू लियोनेल मेस्सी आणि जर्मेन क्लबमधील ब्राझिलचा खेळाडू नेमार यांच्याशी होती.२०१६मध्ये हा किताब जिंकणार्‍या ३२ वर्षीय रोनाल्डोने ला लिगा आणि चॅम्पियन करंडक स्पर्धेमध्ये आपल्या संघाला विजयी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. चॅम्पियन लीगमध्ये यावेळी रोनाल्डोने १२ गोल केले होते. त्याच्याच क्लबचे व्यवस्थापक झिनेदिन झिदानला या वर्षीचा सर्वश्रेष्ठ व्यवस्थापकाचा किताब देण्यात आला. लियोनेल मेस्सीनेसुद्धा ५ वेळा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटूचा किताब आपल्या नावे केला आहे. मेस्सीने हल्लीच झालेल्या विश्‍वचषक पात्रता फेरीमध्ये इक्वाडोरच्या विरूद्ध हॅट्‌ट्रिक करत आपल्या संघाचे पुढील वर्षी होणार्‍या विश्‍वचषक स्पर्धेमध्ये स्थान निश्‍चित केले. दुसरीकडे नेमारने बार्सिलोनासोबत कोपा डेल रे स्पर्धा जिंकली होते. त्यानंतर २२२ मिलियन युरो असा सर्वात महागडा करार करून तो पॅरिस सेंट जर्मेन या क्लबमध्ये दाखल झाला होता.

महिलांमध्ये नेदरलँड्‌सच्या लिके मार्टिन्स हिला सर्वोत्तम खेळाडूचा व सरिना विगमन यांना सर्वोत्तम व्यवस्थापकाचा पुरस्कार देण्यात आला. चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेला इटलीचा गियानलुईगी बफॉन सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्काराचा मानकरी ठरला. सर्वोत्तम गोलसाठीचा ‘पुस्कास’ पुरस्कार ऑलिव्हर गिरोड याला देण्यात आला. ‘फिफा’ने या वेळी ‘वर्ल्ड इलेव्हन’ संघदेखील जाहीर केला. यात गियानलुईगी बफॉन, दानी आल्वेस, लियोनार्डो बोनुक्की, सर्जियो रामोस, मार्सेलो, टोनी क्रूस, आंद्रेस इनिएस्टा, ल्युका मॉड्रिक, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनेल मेस्सी व नेमार यांना स्थान दिले.