‘रॉ’च्या प्रमुखपदी रवी सिन्हांची निवड

0
3

आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांना काल ‘रॉ’चे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रवी सिन्हा हे छत्तीसगढ कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सिन्हा आत्तापर्यंत कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव या पदावर कार्यरत होते. ते आता रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख असतील. काल ही घोषणा करण्यात आली. सध्याच्या रॉ प्रमुख सामंत गोयल यांची जागा ते घेतील. सामंत गोयल हे 30 जून रोजी निवृत्त होत असून, त्यानंतर सिन्हा या पदाचा कार्यभार पुढची दोन वर्षे सांभाळतील.