रेस्टॉरंट मालकाला शिवीगाळ केल्याने ८ पोलीस निलंबित

0
22

सांगोल्डा येथील एका रेस्टॉरंटमध्ये बिल जादा आकारल्याच्या मुद्यावरून मालकाशी वादावादी आणि शिवीगाळ करणार्‍या आठ पोलिसांना काल सेवेतून निलंबित करण्यात आले आहेत.
सांगोल्डा येथील एका रेस्टॉरंटमध्ये वाहतूक विभागातील आठ पोलीस कर्मचारी पार्टीसाठी गेले होते. रेस्टॉरंटच्या मालकाने जादा बिल आकारल्याचा आरोप करून त्या पोलिसांनी मालकांशी हुज्जत घालून शिवीगाळ केली. या प्रकरणी रेस्टॉरंटच्या मालकाने तक्रार केल्यानंतर त्या आठजणांना सेवेतून निलंबित करून चौकशी सुरू केली आहे. रेस्टॉरंटच्या मालकाने साळगाव पोलीस स्थानकावर तक्रार दाखल करून सीसीटीव्ही फुटेज सादर केलेली आहेत.