25 C
Panjim
Monday, August 2, 2021

रेस्टॉरंटस् पूर्ण क्षमतेने सुरू होणे अशक्य

>> संघटनाध्यक्षांचे मत ः कामगार गावी गेल्याने वाढली डोकेदुखी

सोमवारपासून राज्यातील रेस्टॉरंटस् व चहाची हॉटेल्स तसेच मॉल्स व धार्मिक स्थळे उघडण्यास सरकारने मान्यता दिलेली असली तरी सुमारे ८० टक्के हॉटेल्स व रेस्टॉरंटस् काल बंदच राहिल्याचे चित्र पणजीत पहावयास मिळाले. राज्यातील हॉटेल व रेस्टॉरंट संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी काल हॉटेल्स व रेस्टॉरंट खुली करण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ नसल्याने २५ टक्क्यांपेक्षा जास्त हॉटेल व रेस्टॉरंट खुली होणे शक्य नसल्याचे पत्रकारांना सांगितले.

राज्यातील हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कामगार लॉकडाऊनच्या काळात आपल्या मूळ गावी निघून गेल्याने मनुष्यबळाच्या अभावी हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे धोंड म्हणाले. ज्या मोजक्या हॉटेल व रेस्टॉरंटवाल्यांना आपली हॉटेल व रेस्टॉरंट उघडणे शक्य होते त्यांनी काल ती उघडली.
काल या प्रतिनिधीने पणजीतील काही रेस्टॉरंट मालकांशी संवाद साधला असता त्यांनी आजपासून (काल) रेस्टॉरंटस् सुरू होत आहेत ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे असे सांगतानाच आता स्थिती पूर्वीसारखी राहिली नसल्याचे मतही व्यक्त केले.

यासंबंधी बोलताना पणजी शहरातील रित्झ रेस्टॉरंटस् समूहाचे मालक रोहिदास देसाई म्हणाले, की कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती अजून सामान्य पातळीवर आलेली नाही. कोरोनाचा संसर्ग रेस्टॉरंटस्‌मध्ये येणार्‍या लोकांमुळे वाढू नये यासाठी आम्हाला सामाजिक अंतराचे तत्त्व पाळावे लागणार आहे. आमच्यासाठी ती मोठी डोकेदुखी ठरणार आहे. ज्यांच्याकडे १०० आसनांची क्षमता आहे त्यांना एका वेळी ५० ग्राहकांनाच आत सोडता येईल. उर्वरित ५० जणांना ताटकळत बाहेर ठेवावे लागेल. त्यामुळे हे ताटकळत राहणे नकोच असे म्हणत बरेचजण रेस्टॉरंटमध्ये येणे टाळू शकतात. तसे झाले तर रेस्टॉरंटवाल्यांचे नुकसानच होणार आहे. आणखी एक समस्या आहे ती कामगार वर्गाची. रेस्टॉरंटमध्ये वेटर, स्वयंपाकी, सफाई कामगार आदी कामे करणारे लॉकडाऊनला कंटाळून यापूर्वीच आपल्या मूळ गावी गेले आहेत. ते एवढ्यात परतण्याची शक्यता नसल्याने त्याचाही कामावर परिणाम होणार असल्याचे देसाई म्हणाले.

‘नवतारा’ या रेस्टॉरंटच्या समूहाचे पणजीतील व्यवस्थापक म्हणाले की, गोवाभरातील आमच्या १० रेस्टॉरंटमध्ये ४०० जण कामाला आहेत. त्यातील ३२५ जण लॉकडाऊनला कंटाळून आपल्या गावी गेले. आता केवळ ७५ जण शिल्लक राहिले असून त्यांना घेऊन १० रेस्टॉरंट कशी चालवावीत हा प्रश्‍न असल्याचे ते म्हणाले.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चातुर्मास ः उत्सव विशेष

अंजली आमोणकर चातुर्मासात सर्वच गोष्टी आपापसावर अवलंबून असल्याने यापायी नकळत देशाची आर्थिक स्थिती सुधारते. असा हा मनस्वास्थ्य देणारा,...

पत्रकारितेतील प्रदीर्घ कारकिर्दीचा लेखाजोखा

अरविंद व्यं. गोखले(ज्येष्ठ संपादक) ज्येष्ठ पत्रकार श्री. वामन सुभा प्रभू यांच्या ‘द ऍक्सिडेंटल जर्नालिस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन हिमाचल प्रदेशचे...

आणखी एक बँक बुडाली

दिवसागणिक बुडीत खात्यात चाललेल्या मडगाव अर्बन सहकारी बँकेचा व्यवसाय परवाना रद्दबातल करून रिझर्व्ह बँकेने नुकताच निर्णायक दणका दिला. पुढच्याच वर्षी ही बँक...

खनिज विकास महामंडळ विधेयक संमत

>> विरोधकांचा सभात्याग >> विधानसभेत १८ विधेयके चर्चेविनाच संमत राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू होण्याच्या...

पुरामुळे घरे कोसळलेल्यांना १५ ऑगस्टपूर्वी भरपाई : मुख्यमंत्री

हल्लीच आलेल्या पुरामुळे राज्यात ज्या लोकांची घरे कोसळली त्यांना १५ ऑगस्टपूर्वी घरे बांधण्यासाठी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी...

ALSO IN THIS SECTION

खनिज विकास महामंडळ विधेयक संमत

>> विरोधकांचा सभात्याग >> विधानसभेत १८ विधेयके चर्चेविनाच संमत राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू होण्याच्या...

पुरामुळे घरे कोसळलेल्यांना १५ ऑगस्टपूर्वी भरपाई : मुख्यमंत्री

हल्लीच आलेल्या पुरामुळे राज्यात ज्या लोकांची घरे कोसळली त्यांना १५ ऑगस्टपूर्वी घरे बांधण्यासाठी नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी...

कोळसा प्रश्‍नावरून गदारोळ

>> विधानसभेचे कामकाज दीड तास तहकूब गोव्याला मिळालेल्या कोळशाच्या पट्ट्यासंबंधी विधानसभेत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर न देता तो प्रश्‍न...

कोरोनाने २ मृत्यू, १५२ बाधित

राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात एकूण ४३२२ स्वॅबच्या चाचण्या केल्या असता त्यात १५२ चाचण्या...

विद्याधीशतीर्थ स्वामींचे पीठारोहण भक्तिभावाने

५४० वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी मठाचे २४वे स्वामी महाराज म्हणून श्र्‌रीमद् विद्याधीश श्र्‌रीपाद वडेरतीर्थ स्वामी महाराजांनी काल शुक्रवारी...