नवी दिल्लीहून आलेल्या गोवा एक्स्प्रेसमधील सुमारे ६०० किलो गोमांस जप्त केल्याची घटना ताजी असताना काल पुन्हा सकाळी गोवा एक्स्प्रेसमधून पाठविलेले गोमांसाचे पाच बॉक्स पोलिसांनी ताब्यात घेतले. काल सकाळी गोवा एक्स्प्रेस ट्रेनमधून गोमांसाचे पाच बॉक्स उतरविण्यात आले व वास्को-कुळे या ट्रेनमधील पार्सल बोगीमध्ये घालून ठेवण्यात आल्याचा सुगावा शिवसेनेचे मारुती शिरगांवकर यांना लागताच त्यांनी रेल्वे स्थानकावर धाव घेऊन रेल्वे अधिकार्यांना त्या रेल्वेची पार्सल बोगी उघडण्यात भाग पाडले असता त्यामध्ये गोमांसाची पाच बॉक्स सापडली. याविषयी पार्सल विभागातील कारकूनाकडे चौकशी केली असता सदर पार्सल रोजचीच असल्याचे त्याने सांगितले.

