Home बातम्या रीवण येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू

रीवण येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू

0

सोनारभाट रीवण येथे सौ. शुभदा श्रीकृष्ण देव ही ५१ वर्षीय विवाहीत महिला संशयास्पदरित्या कुळागरात मृतावस्थेत आढळली. तिच्या गुडघ्याला व डोक्याला इजा झाली होती, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

मयत शुभदा काल सकाळी ७ वाजता घराजवळ असलेल्या कुळागरात गेली होती. नंतर साडेआठ वाजता तिचा मृतदेह कुळागरात जमिनीवर पडलेल्या स्थितीत होता. तिच्या गुडघ्याला खरचटले होते तर डोके दगडावर आपटलेल्या स्थितीत होते. दगड जमिनीत रुतलेला होता.

या प्रकारामुळे ती दगडावर पाय घसरून पडली की कोणी तिला जाणूनबुजून दगडावर ढकलले याचा पोलीस तपास करीत आहेत. केपे पोलिसांनी घटनास्थळी श्‍वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करून तपास केला.