राहुल गांधी लवकरच कॉंग्रेसाध्यक्षपदी : सोनिया

0
87

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे कॉंग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल स्पष्ट केले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलताना श्रीमती गांधी यांनी यावर स्पष्ट भाष्य केले.
४७ वर्षीय राहुल गांधी २०१३ पासून कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदावर आहेत. सोनिया गांधी १९९८ पासून कॉंग्रेसाध्यक्ष म्हणून काम पाहत असून त्या सर्वाधिक १९ वर्षे या पदावर आहेत.

या पदाची सूत्रे त्यांनी सीताराम केसरी यांच्याकडून स्वीकारली होती. कालच उत्तराखंड प्रदेश कॉंग्रेसने राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष व्हावे असा ठराव संमत केला होता. सचिन पायलट यांनी राहुल गांधी दिवाळीनंतर कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे घेतील असे संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते.