27.6 C
Panjim
Wednesday, May 19, 2021

राहुल गांधींनी सभा घेतलेल्या दोन्ही ठिकाणी कॉंग्रेसचे डिपॉझिट जप्त

पश्‍चिम बंगालमधील निवडणुकीत ज्या मतदारसंघांत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या, त्या दोन्ही मतदारसंघांतील कॉंग्रेस उमेदवारांचे निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले आहे. कॉंग्रेस – डावे पक्ष यांच्या तिसर्‍या आघाडीच्या जवळजवळ ८५ टक्के उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. तिसर्‍या आघाडीच्या उमेदवारांना पश्‍चिम बंगालमधील २९२ पैकी केवळ ४२ मतदारसंघांमध्ये आपली अनामत वाचवता आली.

उमेदवाराला एकूण मतदानाच्या १६.५ टक्के मतेही मिळू शकली नाहीत तर त्याची अनामत रक्कम जप्त होते. कॉंग्रेस तसेच डाव्या पक्षांना पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. इंडियन सेक्युलर फ्रंट ह्या तिसर्‍या आघाडीतील घटक पक्षाला मात्र एक जागा मिळाली. आपल्या दोन्ही मित्रपक्षांपेक्षा इंडियन सेक्युलर फ्रंटने चांगली कामगिरी बजावली आहे.

राहुल गांधी यांनी माटिगारा – नक्षलबाडी व गोलपोखर ह्या दोन मतदारसंघांमध्ये १४ एप्रिल रोजी प्रचारसभा घेतल्या होत्या. त्या दोन्ही मतदारसंघांतील कॉंग्रेसच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. कॉंग्रेसपाशी माटिगारा – नक्षलबाडी मतदारसंघ गेली दहा वर्षे होता, परंतु ह्यावेळी विद्यमान कॉंग्रेस आमदार शंकर मलाकर हे तिसर्‍या स्थानी फेकले गेले. त्यांना जेमतेम ९ टक्के मते मिळाली.

गोलपोखर मतदारसंघातही कॉंग्रेस उमेदवार तिसर्‍या जागी फेकला गेला. त्याला १२ टक्के मतेच मिळू शकली. हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे २००६ ते २००९ व नंतर २०११ ते २०१६ ह्या काळात होता.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

इकडेही लक्ष द्या

कोरोनाचा वणवा राज्यात चहुदिशांनी भडकल्यावर आणि सर्वतोपरी सज्जतेचे दावे उच्च न्यायालयात उघडे पडल्यावर आता राज्य सरकार उपाययोजनांच्या विहिरी खोदायला निघाले आहे. गोवा...

कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८ राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा...

प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा...

गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती...

कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान...

ALSO IN THIS SECTION

येत्या १५ दिवसांत राज्यांना १.९२ कोटी डोस ः जावडेकर

येत्या पंधरा दिवसांत केंद्र सरकारकडून राज्यांना १.९२ कोटी लशींचे डोस देण्यात येतील अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिली. देशातील...