राहुल गांधींच्या जामिनात वाढ

0
5

‘मोदी’ आडनावाच्या बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना सुरत जिल्हा न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यावेळी त्यांना या प्रकरणात जामीनही मंजूर करण्यात आला होता. जामिनात वाढ व्हावी, यासह आणखी दोन अर्ज त्यांनी काल दाखल केले. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होऊन राहुल गांधी यांच्या जामिनात वाढ करण्यात आली. राहुल गांधी यांना काल मिळालेला जामीन हा त्यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर निर्णय होईस्तोवर कायम असणार आहे.
शिक्षेविरोधात आव्हान देण्यासाठी न्यायालयाने राहुल गांधींना 30 दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार, शिक्षा सुनावल्यानंतर तब्बल 11 दिवसांनी काल राहुल गांधींनी न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. राहुल गांधी यांनी दोन याचिका दाखल केल्या. त्यापैकी एक याचिका शिक्षा स्थगितीबाबत होती. या याचिकेवर आता पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होणार आहे. दुसरी याचिका दोषी असण्याला आव्हान देण्याबाबत होती. त्यावर 3 मे रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणी मूळ याचिकाकर्ता पूर्णेश मोदी यांनाही नोटीस जारी केली आहे.