Home बातम्या ‘रासुका’खाली अटक

‘रासुका’खाली अटक

0

मोती डोंगर येथील कुप्रसिध्द गुंड जलील शेख याला परवा रात्री उशीरा रा. सु. का खाली अटक केली. गेल्या कित्येक दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. २००३ पासून २०१२ पर्यंत त्याच्यावर ९ गुन्हे आहेत. त्यात रस्ता अडविणे, मारहाण करणे, जीवे मारण्यााची धमकी देणे, लोक जमाव करून हिंसक प्रकरण करणे, बळजबरीने घरात घुसून मालमत्तेची नासधूस करणे, मोती डोंगरावर ट्रकात तलवारी लपवून ठेवणे, प्राणघातक हल्ला करणे व खुनाचा प्रयत्न करणे त्याशिवाय अनेक चॅप्टर केसीस त्याच्यावर आहेत.

दक्षिण गोवा पोलिसांनी त्याच्यावरील गुन्ह्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविला होता. मोती डोंगरवरील बशीर शेख याच्यावरही रा. सु. का. कायद्याखाली अटक होण्याची शक्यता आहे.