गोव्यातील सफाई कर्मचार्यांच्या सामाजिक, आर्थिक, जीवनमान व शिक्षण यांचा ते अभ्यास करतील. या बैठकीस गृह सचिव, समाजकल्याण, ग्रामीण विकास यंत्रणा, पोलीस सरसंचालक, मागास जाती-जमाती वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांना बैठकीस निमंत्रित केले आहे.
काही खात्यांतील सफाई कर्मचार्यांची स्थिती बिकट असल्याचे समाजकल्याण अधिकार्यांचे म्हणणे आहे. वरील आयोग या विषयाचा अभ्यास करून राष्ट्रीय पातळीवर अहवाल सादर करतील. सफाई कर्मचार्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याच्या हेतूनेच कृष्णमूर्ती गोव्यात आले आहेत.