राष्ट्रीयकृत बँका 5 दिवस राहणार बंद

0
13

शनिवार-रविवारी सुट्टी, तर सोमवारपासून 3 दिवस संप

देशातील राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवार दि. 28 ते बुधवार दि. 30 सप्टेंबर या कालावधीत संप पुकारला असून, त्याआधी शनिवार दि. 26 व रविवार दि. 26 या दोन दिवसांच्या सुट्टीमुळे एकूण 5 दिवस बँका बंद राहणार आहेत.
शनिवार दि. 26 ते बुधवार दि. 30 सप्टेंबर असे या महिन्याचे शेवटचे 5 दिवस बँका बंद राहणार असल्याने देशभरातील लोकांबरोबरच गोव्यातील बँक खातेधारकांचीही कधी नव्हे एवढी अडचण होणार असून, या पार्श्वभूमीवर बँक ऑफ इंडियाने खातेधारकांसाठी सूचना जारी केली आहे.

सोमवार दि. 28 ते बुधवार दि. 30 असे तीन दिवस बँकांचा संप असून, शनिवारी दि. 26 रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने त्या दिवशी बँका बंद राहणार आहेत, तर 27 रोजी रविवार आहे. त्यामुळे 26 पासून 30 असे या महिन्याचे शेवटचे पाच दिवस बँका बंद राहणार असल्याने प्रत्यक्ष बँकेत जाऊन करण्याजोगे कोणतेही व्यवहार बँक खातेधारकांना वरील काळात करता येणार नाहीत.
बँकांना पाच दिवसांच्या कामकाजाचा आठवडा लागू करावा, ही बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. युनायटेड फोरम ऑफ युनिएन्सने या संपाची घोषणा केली आहे. शनिवार व रविवारला जोडून तीन दिवसांच्या संपाची आखणी करण्यात आली असल्याने चालू महिन्याचे शेवट पाच दिवस बँका बंद राहणार आहेत.