राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत जाणारच नाही ः शरद पवार

0
17

राष्ट्रवादी पक्ष कधीच भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या नात्याने शरद पवार यांनी दिले. राष्ट्रवादीतील एक गट भाजपमध्ये गेला असला तरी मूळ पक्ष भाजपसोबत जाणार नसल्याचे पवार यावेळी म्हणाले. दरम्यान, पुढील रणनीती ठरवण्यासाठी 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक बोलावण्यात आली असून मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये 1 सप्टेंबर रोजी विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे, यात पुढील रणनीतीविषयी चर्चा होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोलेंच्या मुख्य उपस्थितीत ही बैठक होणार आहे. 35 ते 40 नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.