राष्ट्रवादी कॉंग्रेस गोव्यासह ३ राज्यांत लढणार ः पवार

0
10

राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, राष्ट्रवादी कॉंग्रेस आगामी ५ पैकी ३ राज्यांच्या निवडणुकीत सहभागी होणार असून गोव्यात कॉंग्रेस, तृणमूल, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची असून त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिली आहे. पुढील २ दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होईल, असे सांगितले.

गोव्यासह मणिपूर व उत्त्तर प्रदेशात आम्ही रिंगणात उतरणार असून उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांची युती झाली असून उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे कॅबिनेट मंत्री स्वामीप्रसाद मौर्य यांनी भाजपला रामराम करत समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत १३ आमदार आणि इतर काही नेतेदेखील सपात प्रवेश करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.