Home बातम्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आमदार-खासदारांचे मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आमदार-खासदारांचे मतदान

0

सर्वप्रथम आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मतदान केले. नंतर उर्वरित आमदारानी व मंत्र्यांनी मतदान केले. उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यानीही येथील सचिवालयात मतदान केले. तर खासदार फ्रान्सिस सार्दिन व शांताराम नाईक यांनी नवी दिल्लीला जाऊन मतदान केले.

गोव्यातील आमदार व खासदार यांनी केलेल्या मतांचा आकडा २९२४ एवढा झाला आहे. एका आमदाराचे मत म्हणजे २० तर खासदाराचे मत म्हणजे ७०८ मूल्य एवढे असल्याचे सूत्रांनी सांगितले.