राय येथे मजुराचा खून

0
115

वैयक्तिक वैमनस्यातून कोल्यांडोंगर- राय येथे रविवारी रात्रौ झारखंड येथील मुकेश गजेंस सिंग याचा विवेक देवसिंग याने कुर्‍हाडीने डोक्यावर प्रहार करून खून केला. मायणा कुडतरी पोलिसांनी विवेक देवसिंग याला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबूली दिली.

मुकेश व विवेक हे झारखंडमधील असून गेल्या दीड महिन्यांपासून राय येथील एका घरांत भाड्याने खोली घेवून रहात होते. मुकेश विवेकला नेहमी बसून खातो, काम करीत नाही म्हणून चिडवीत होता. त्यांचे अधूनमधून खटके उडत होते.