रायबंदर येथील अपघातात पोलीस शिपाई ठार

0
112

पणजी पोलीस स्थानकाचा पोलीस शिपाई गौरेश गावकर (२४) काल रायबंदर पाटो येथे झालेल्या अपघातात ठार झाला. गौरेश हा मूळ वाळपई येथील असून तो आपल्या दुचाकीवरून पणजीच्या दिशेने येत होता. टाटा रिक्षा पणजीहून राबंदरच्या बाजूने जात होती. रिक्शाने ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत गौरेशला बांबोळी इस्पितळात नेत असताना त्याचे निधन झाल्याचे जुने गोवे पोलिसांनी सांगितले.