रायबंदर – चोडण फेरीसेवेसाठी सुधारित शुल्क 7 पासून लागू

0
11

राज्य सरकारच्या नदी परिवहन विभागाने रायबंदर ते चोडण फेरीसेवेसाठी सुधारित शुल्क आणि मासिक पास दर अधिसूचित केले आहे. सुधारित शुल्क येत्या 7 जुलै 2025 पासून लागू केले जाणार आहे, असे सूचनेत म्हटले आहे.

या जलमार्गावर लवकरच दोन रो-रो फेरी तैनात केल्या जाणार आहेत. फेरीबोटीमध्ये दुचाकी वाहनांना शुल्क आकारले जाणार नाही. तर, कार, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना प्रति फेरी 30 रुपये आकारले जातील. मासिक पास 900 रुपयांचा घेतल्यास कितीही फेऱ्या मारल्या जाऊ शकतात. मध्यम व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांना प्रति फेरी 100 रुपये (मासिक पाससाठी 1,500 रुपये) आणि 10 टनांपेक्षा कमी वजनाच्या मोटार वाहनांना प्रति फेरी 400 रुपये (मासिक पाससाठी 6,000 रुपये) आकारले जातील. स्वारांसह भाड्याने घेतलेल्या दुचाकी वाहनांना प्रति फेरी 100 रुपये, प्रवाशांसह भाड्याने घेतलेल्या कारसाठी 300 रुपये आणि पर्यटकांना प्रति फेरीसाठी 50 रुपये आकारले जातील, असेही सूचनेत म्हटले आहे.