राम मंदिरात देणगी चोरीच्या 105 घटना

0
13

अयोध्येतील राम मंदिरात देणगी चोरीच्या 105 घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सोमवारी सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करत असून, या तपासातून ही माहिती समोर आली आहे. एसआयटी तपासातून समोर आलेली माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. एसआयटी तपास अंतिम टप्प्यात असून, 25 सप्टेंबरला आरोपपत्र दाखल केले जाईल, असेही मेहता यांनी सांगितले.

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणी सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने काल एसआयटीच्या तपासाच्या सद्यस्थितीचा अहवाल तपासला. या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या आणि गोळा करण्यात आलेल्या पुराव्यांची माहिती देखील न्यायालयाला देण्यात आली. न्यायालयात सादर पुराव्यांमध्ये सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांच्या जबान्या यांचा समावेश आहे.