गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत पांडुरंग कुर्टीकर यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. पांडुरंग कुर्टीकर (सर्वसामान्य श्रेणी), विनायक नार्वेकर, विठ्ठलदास वेर्णेकर व कृष्णा कुडणेकर (व्हीकेएस श्रेणी), श्रीकांत नाईक (ग्राहक श्रेणी), दादू नाईक व विजयकांत गावकर (दुग्ध श्रेणी), श्रीपाद परब (नगर श्रेणी), प्रिया टांगसाळी व शाबा सावंत देसाई (पगारदार श्रेणी), चित्रा वायंगणकर व मैथिली परब (महिला श्रेणी), तर प्रभाकर गावकर (अनुसूचित जाती-जमाती श्रेणी) यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश आहे.

