Home Featured राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी अरविंद कुमार नायर यांची निवड

राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी अरविंद कुमार नायर यांची निवड

0

राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी अरविंद कुमार नायर आणि राज्य माहिती आयुक्तपदी आत्माराम बर्वे यांच्या नावांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. ही बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची उपस्थिती होती.
विश्वास सतरकर आणि संजय ढवळीकर यांचा अनुक्रमे मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर गेले पाच महिने दोन्ही पदे रिक्त होती. राज्य माहिती आयुक्तालयातील दोन्ही पदे रिक्त असल्याने कामकाज ठप्प झाले होते. राज्यपालांनी दोन्ही पदांवर नव्या नियुक्तीला मान्यता दिल्यानंतर याबाबतचा आदेश जारी केला जाणार आहे.
राज्य मुख्य माहिती आयुक्तपदासाठी निवड करण्यात आलेले अरविंद कुमार हे इंटेलिजन्स ब्युरोचे (आयबी) माजी गोवा प्रमुख आहेत, तर आत्माराम बर्वे हे मुख्यमंत्र्यांचे ओएसडी म्हणून कार्यरत आहेत.