राज्य चित्रपट महोत्सवाच्यातयारीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

0
12

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काल गोवा मनोरंजन सोसायटीच्या झालेल्या सर्वसाधारण मंडळाच्या बैठकीत येत्या 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या दहाव्या, अकराव्या व बाराव्या आवृत्तीचा समावेश असेल.

या बैठकीला गोवा मनोरंजन सासायटीच्या उपाध्यक्ष आमदार डिलायला लोबो, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडीवेलू व अन्य अधिकारी हजर होते. महोत्सवाची तयारी, लॉजिस्टिक्स, प्रोग्रामिंग व प्रोमोशन यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
माहिती व प्रसिद्धी खात्याच्या सहकार्याने हा महोत्सव होणार असून, मॅकेनिज पॅलेस थिएटर व आयनॉक्समध्ये या महोत्सवातील चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. स्पर्धा विभागासाठी चित्रपट सादर करण्याची प्रक्रिया 17 जूनपासुन 7 जुलैपर्यंत चालली. या महोत्सवात गोव्यातील कोकणी व मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत.

दहाव्या आवृत्तीत 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत बनवलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. अकराव्या आवृत्तीत 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत बनवलेले, तर बाराव्या आवृत्तीत 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत बनवलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.