राज्यात ४ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार

0
10

राज्यात येत्या ४ ऑगस्टपासून पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता येथील हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे. दरम्यान, चोवीस तासांत केपे, काणकोण, मडगाव आणि सांगे येथे काही प्रमाणात पावसाची नोंद झाली.