राज्यात चोवीस तासांत नवीन ८२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील सक्रियरुग्ण संख्या ७२१ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३८४६ एवढी आहे. चोवीस तासांत नवीन १५१८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील ८२ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले. राज्यातील कोरोना बाधित आढळून येण्याचे प्रमाण ५.४ टक्के एवढे आहे. राज्यात आणखीन १०९ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ एवढे आहे.