31 C
Panjim
Monday, January 25, 2021

राज्यात मुबलक जीवनावश्यक वस्तू उपलब्ध ः गावडे

राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक  साठा आहे. वाहतुकीच्या समस्येमुळे  काही दिवस समस्यांना तोंड द्यावे लागले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्याच्या मुख्य सचिवांशी  चर्चा केल्यानंतर जीवनावश्यक मालाची वाहतूक सुरू झाल्याने प्रश्‍न सुटला आहे. राज्यातील घाऊक व्यापार्‍यांशी जीवनावश्यक वस्तूबाबत चर्चा केली जात आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानात गहू, तांदूळ, डाळ, साखर उपलब्ध करण्यात आली आहे, असे नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

राज्यात लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूच्या जास्त दराने विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी खास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा  काळाबाजार रोखण्यासाठी उपाय योजना केली जात आहे. वस्तूची जास्त दराने विक्री करणार्‍यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे, असे गावडे यांनी सांगितले.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

गो गोवा ऑर्गेनिक

श्रीरंग व्यंकटेश जांभळे सध्या चालू असलेला शेतीतील रसायनांचा वापर जमीन, पर्यावरण, प्राणी, मनुष्य यांच्या आरोग्याला घातक असून याचे...

‘कोरोना’च्या आशीर्वादाचे- असेही अभ्यंग… अवती-भवती

अंजली आमोणकर या लॉकडाऊनपायी मिळालेल्या जबरदस्तीच्या कैदेत सर्वांना ‘मनाच्या अभ्यंगाचा’ आशीर्वाद मिळून गेला. एकमेकांचा यथेच्छ सहवास मिळाल्यामुळे, मनातल्या...

सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक तजवीज

शशांक मो. गुळगुळे तुम्ही पेन्शनधारक असाल तर महिन्याला निश्‍चित ठरावीक उत्पन्न मिळू शकते. पेन्शन वृद्धांना स्वावलंबी बनवते. म्हणून...

दुभंगलेला अमेरिकन समाज

दत्ता भि. नाईक आतापर्यंत अमेरिकेतील द्विपक्षीय लोकशाही खेळीमेळीने चालते असा लौकिक होता. दोन्ही पक्षांमध्ये देशाच्या ध्येयधोरणांविषयी मतभिन्नता नसल्यामुळे...

कोरोनानंतरचे अर्थकारण

महेश देशपांडे, (गुंतवणूक सल्लागार) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बरेच काही बदलणार आहे. गुंतवणूक म्हणून मालमत्तेपेक्षाही शेअर्स तसंच...

ALSO IN THIS SECTION

‘इन टू द डार्कनेस’ला सुवर्ण मयुर

>> इफ्फीचा शानदार समारोप, अभिनेते विश्‍वजीत चटर्जी यांना भारतीय व्यक्तिमत्व पुरस्कार काल रविवार दि. २४ रोजी समारोप झालेल्या ५१व्या...

मुंबईत शेतकर्‍यांचा महामुक्काम सत्याग्रह

केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरुद्ध गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईत महामुक्काम सत्याग्रह सुरू करण्यात...

दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चासाठी पोलिसांनी दिली परवानगी

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनातील शेतकर्‍यांनी उद्या मंगळवार दि. २६ रोजी प्रजासत्ताक दिनी टॅक्टर मोर्चा काढण्यासाठी...

आजपासून हिवाळी अधिवेशन

गोवा विधानसभेच्या चार दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सोमवार २५ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता प्रारंभ होणार असून २९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. राज्यपाल भगत सिंग...

दाबोळी विमानतळावर ९३ लाखांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर गोवा जकात विभागाने केलेल्या कारवाईत २ किलो १७० ग्रॅम वजनाचे तस्करीचे सोने जप्त केले. याची किंमत ९५ लाख ३ हजार...