28.1 C
Panjim
Sunday, September 26, 2021

राज्यात पुरामुळे हाहाकार

>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान

>> आज व उद्या सतर्कतेचा इशारा

>> २० रेल्वे रद्द

>> राज्यात चौघांचा मृत्यू

समुद्रातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यात गेले कित्येक दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. राज्यात काल गुरूवारी मध्यरात्री सत्तरी, डिचोली, सांगे, वाळपई, साखळी या भागांत पडलेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. धारबांदोड्यातील एक महिला वाहून गेली तर सावईवेर्‍यात तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. हवामान विभागाने राज्यात २४ व २५ जुलैला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

या पावसामुळे घर, बागायती, शेती यांचे मोठे नुकसान झाले आहे. सत्तरी, डिचोली, फोंडा, केपे, सांगे या तालुक्यांना जोरदार पावसाची झळ बसली. कुळे येथे दुधसागराच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली व आसपासच्या भागांचा दौरा करून संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याची सूचना सरकारी अधिकार्‍यांना केली. पुरामुळे संकटात सापडलेल्या हरवळे येथे ३० नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

वाळपईत ११.६६ इंच पाऊस
गेल्या चोवीस तासांत वाळपईमध्ये ११.६६ इंच पाऊस कोसळला. या भागातील वाळवंटी व इतर नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सांगे येथे ८.३८ इंच पावसाची नोंद झाली. साखळी येथे ७ इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे ५.८४ इंच पावसाची नोंद झाली. काणकोण येथे ४.२८ इंच, फोंडा येथे ४.२१ इंच, ओल्ड गोवा येथे ४.०५ इंच पावसाची नोंद झाली. राज्यात गेल्या चोवीस तासांत ४.५२ इंच तर एकूण ८४ इंच पाऊस पडला आहे.

१९८२ नंतर पूर ः मुख्यमंत्री
राज्यात आलेला पूर हा वर्ष १९८२ सालापेक्षा मोठा आहे. सत्तरी, डिचोली, बार्देश, फोंडा, पेडणे, धारबांदोडा तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. धारबांदोड्यात एका महिलेच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र, तो मृत्यू पुरामुळेच की अन्य कारणामुळे झाला हे अजून नक्की झालेले नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पैकूळ सत्तरीच्या पुलाचे काम त्वरित सुरू केले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतजमिनीला फटका
पुराचा ८२३ हेक्टर शेतजमिनीला फटका बसला आहे. शेताचे एकूण २ कोटी ५५ लाखांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी दिली.

धारबांदोड्यात महिलेचा मृत्यू
धारबांदोडा तालुक्यातील एक वृद्ध महिला काल वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला आहे. गावात पाणी शिरल्यामुळे सदर महिला आपल्या कुटुंबासमवेत दुसरीकडे जात होती. त्यावेळी ती वाहून गेली. दरम्यान, वाळपई येथील श्रीराम गोशाळेलाही पावसाचा फटका बसला असून या गोशाळेतील २० गुरे वाहून गेली. तसेच गोशाळेतील इतर लाखो रुपयांच्या सामानाचेही नुकसान झाले आहे.

विजेच्या धक्क्याने सावईवेर्‍यात
तीन कामगार ठार, एक गंभीर

सावईवेरे येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज खांबांवरील जुन्या निर्जीव वीजवाहिन्या काढत असताना विजेचा धक्का बसून तिघेजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना काल बेताळभाट सावईवेरे येथे घडली.

यात बादशा (४५), दुर्गेश (२१) व अरविंद कुमार (१९) हे ठार झाले आहेत. तर रामा कुमार (२२) हा कामगार गंभीर जखमी झाला.
त्याच्यावर बांबोळी इस्पितळात उपचार सुरू आहेत. बेताळभाट-सावईवेरे येथे रस्त्यावर नवीन वीजवाहिन्या कार्यान्वित करण्यात आल्या असून, दुसर्‍या बाजूला जुने लोखंडी वीज खांब तारांसहीत आहेत. या जुन्या वाहिन्यांचा वीजप्रवाह खंडित केल्यानंतर या निर्जीव वीजवाहिन्या काढण्याचे काम हे चौघेही कामगार करीत होते.

शेवटच्या खांबावर काम सुरू असताना खांब अचानक मोडून जवळच्या केबलच्या वाहिन्यांवर कोसळला. त्यावेळी जुन्या वीजतारा या चारही कामगारांच्या हातात असल्याने त्यांना विजेचा झटका बसला व ते रस्त्यावर फेकले गेले. यातील दोघेजण जागीच ठार झाले तर एकाचा इस्पितळात उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.

दुर्घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. पोलिस यासंबधी तपास करीत आहेत. संबंधित कामगार उतरप्रदेश येथील असून ते फोंडा व केरी भागात राहत होते.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

महिलांचे अर्थार्जन

नीना नाईक दोन वर्षांत यश-अपयश, बेरीज-वजाबाकी यात प्रेम, द्वेष, आत्मीयता हे उघड झाले. कुठलाही व्यवसाय करताना… कोरोनाने हे...

‘डिटॉक्स डाएट’ म्हणजे काय?

वर्षा भिडे(आहारतज्ज्ञ) डिटॉक्स आहाराची गरज असेल तरच आणि व्यावसायिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचा अवलंब करा, अन्यथा ते प्रकृतीसाठी त्रासदायक...

‘कॉलेजविश्व’

शुभंकर जोगजीव्हीएम्स जीजीपीआर कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स, फर्मागुडी मागची काही वर्षे आपण बघतोय ही कोरोना महामारी चालू आहे ज्यामुळे आपल्याला...

गोव्यातही खेला होबे!

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सध्या लोकप्रिय घोषणांच्या आतषबाजीत गोव्याचे राजकीय वातावरण ढवळून काढलेले असताना तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही...

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलच्या युतीसाठी शरद पवार प्रयत्नशील

>> राज्यातील नेत्यांनी मुंबईत घेतली भेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार चालवल्याच्या पार्श्‍वभूमीवर...

ALSO IN THIS SECTION

गोव्यातही खेला होबे!

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सध्या लोकप्रिय घोषणांच्या आतषबाजीत गोव्याचे राजकीय वातावरण ढवळून काढलेले असताना तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही...

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलच्या युतीसाठी शरद पवार प्रयत्नशील

>> राज्यातील नेत्यांनी मुंबईत घेतली भेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार चालवल्याच्या पार्श्‍वभूमीवर...

सीझेडएमपी मसुदा सादरीकरणासाठी आणखी ६ महिन्यांची मुदतवाढ द्या

>> सरकारची राष्ट्रीय हरित लवादाकडे मागणी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याचा (सीझेडएमपी) मसुदा तयार करण्यासाठी आणखी ६ महिन्यांचा कालावधी वाढवून...

भारत-अमेरिकेतील संबंध मजबूत करणार : बायडन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौर्‍यावर असून, काल त्यांनी द्विपक्षीय बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली. यावेळी बायडन यांनी भारत...

आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी सहा जणांना ठोकल्या बेड्या

>> वास्को पोलिसांची कारवाई; लॅपटॉप,मोबाईलसह अन्य साहित्य जप्त वास्को पोलिसांनी एका माहितीच्या आधारे वाडे-वास्को येथील ‘सुशीला सी विंग’च्या एका...