राज्यात पावसाच्याअधूनमधून सरी

0
9

गेल्या 8-10 दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने काल राज्याच्या विविध भागांत हजेरी लावली. दुपारनंतर विविध ठिकाणी सरी कोसळल्या. दरम्यान, राज्यात मागील आठ दिवसात केवळ 0.91 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाच्या तुटीचे प्रमाण 37.6 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 35.95 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भात शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. भाताची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना सध्या भात पिकाला कृत्रिमरित्या पाणी उपलब्ध करावे लागत आहे. काही शेतकऱ्यांना पावसाच्या अभावामुळे भात पिकाची लागवड लांबणीवर टाकावी लागली आहे. काणकोण, धारबांदोडा, मडगाव, सांगे, केपे, वाळपई या भागात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.
सुलेमान खान