राज्यात पावसाची विश्रांती

0
35

चोवीस तासांत केवळ 0.49 इंच

राज्यात चोवीस तासांत नैऋत्य मान्सून कमकुवत झाला असून केवळ 0.49 इंच पावसाची नोंद झाली आहे. येथील हवामान विभागाने 18 ते 23 जूनसाठी एलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यातील बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे. राज्याला चार दिवस झोडपून काढल्यानंतर सोमवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.
सांगे येथे सर्वाधिक 0.96 इंच पावसाची नोंद झाली. साखळी येथे 0.86 इंच, म्हापसा येथे 0.43 इंच, जुने गोवा येथे 0.58 इंच, फोंडा येथे 0.82 इंच, धारबांदोडा येथे 0.71 इंच, केपे येथे 0.59 इंच अशा पावसाची नोंद झाली आहे. पेडणे, पणजी, दाबोळी, मुरगाव आदी ठिकाणी किरकोळ पावसाची नोंद झाली आहे.

पडझडीच्या 80 घटना

राज्यात चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या 80 घटनांची नोंद अग्निशामक दलाकडे झाली असून सुमारे 6 लाख 31 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वेर्ला काणका येथे एका घरावर झाड मोडून पडल्याने 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पाळी येथे एका घरावर झाड मोडून पडल्याने 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दवर्ली येथे एका शेडवर झाड मोडून पडल्याने दोन कार गाड्याचे सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बोर्डे डिचोली येथे घरावर झाड मोडून पडल्याने 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कोलवाळ येथे एका घरावर आंब्याचे झाड मोडून पडल्याने 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.