राज्यात पावसाचा शिडकावा

0
25

बंगालच्या उपसागरातील असानी या चक्रीवादळामुळे राज्यातील पणजी, बांबोळी, साखळी, काणकोण व इतर भागात काल पावसाच्या सरी कोसळल्या.

बंगालच्या उपसागरातील असानी चक्रीवादळामुळे १३ ते १५ मे दरम्यान गुजरात किनारपट्टी आणि उत्तर पूर्व अरबी समुद्रात ताशी ४०-४५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची हवामान विभागाने काल वर्तविली आहे, तर ११ ते १३ मे २०२२ दरम्यान तामिळनाडू किनारपट्टी व आसपासच्या भागात ताशी ४०-५० ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

या काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तथापि, गोवा किनारपट्टीवरील मच्छिमारांना कोणताही धोका नाही, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. बंगालच्या उपसागरातील असानी चक्रीवादळ आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर धडकले आहे. ओडिशा, बंगालच्या उपसागराकडे सरकणार्‍या या चक्रीवादळाची दिशा बदलली आहे.