राज्यात पावसाचा जोर वाढला

0
51

विविध ठिकाणी झाडांची पडझड; वीजपुरवठ्यावर परिणाम; रस्ते, बाजारपेठांत पाणी साचण्याच्याही घटना; 24 तासांत 3.44 इंच पाऊस

राज्यात पावसाचा जोर काल वाढला असून, जोरदार वाऱ्यामुळे झाडांची पडझड देखील झाली. राज्यात चोवीस तासांत 3.44 इंच पावसाची नोंद झाली. काणकोण येथे सर्वाधिक 7.55 इंच पावसाची नोंद झाली असून, राज्यात आत्तापर्यंत एकूण 10.88 इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाची तूट 72 टक्क्यांवरून 58.8 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. दरम्यान, हवामान विभागाने 24 जूनसाठी यलो अलर्ट, तर 25 जूनसाठी ऑरेंज अलर्ट जारी करत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय 26 ते 29 जून या कालावधीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यात 21 जूनपासून पुन्हा पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसाबरोबर जोरदार वारे वाहत असल्याने झाडांची पडझड सुरू झाली आहे. झाडांच्या पडझडीमुळे काही भागांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. राज्यातील अनेक भागांत रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या. गटारांची स्वच्छता न झाल्याने म्हापसा बाजारपेठेसह अन्य काही बाजारपेठांमध्ये पाणी साचण्याचे प्रकारही घडले.

झाडांच्या पडझडीच्या
44 घटनांची नोंद

राज्याच्या विविध भागांत जोरदार वारे आणि पावसामुळे झाडांच्या पडझडीमुळे घरे, वीज खांब, वाहनांचे नुकसान झाले. चोवीस तासांत अग्निशामवाळपईतही पडझड
बह्मकरमळी-नगरगाव येथे महाकाय पिंपळा वृक्ष अचानक कोसळून माजी सरपंच सौ. सुमित्रा यतींद्र नाडकर्णी यांच्या घराचे नुकसान झाले.
होंडा येथील नारायणनगर परिसरात गणपती मंदिराजवळ मंगळवारी सकाळी एका गॅरेजवर झाडाचा मोठा भाग कोसळला, तसेच हे झाड रस्त्यावरही पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. क दलाकडे झाडांच्या पडझडीच्या 44 घटनांची नोंद झाली. तसेच दरड कोसळण्याच्या एका घटनेची नोंद झाली. पणजी, ताळगाव, बांबोळी व इतर भागांत झाडांच्या पडझडीच्या घटनांची नोंद झाली.

चोवीस तासांत किती पाऊस?
म्हापसा- 5.16 इंच, पेडणे- 3.55 इंच, पणजी- 1.56 इंच, जुने गोवे- 2.96 इंच, साखळी- 3.07 इंच, फोंडा- 0.78 इंच, धारबांदोडा- 2.84 इंच, काणकोण- 7.55 इंच, दाबोळी- 2 इंच, मडगाव- 4.38 इंच, मुरगाव- 1.32 इंच, केपे- 5.11 इंच, सांगे- 4.73 इंच. वाळपई येथील पावसाची माहिती उपलब्ध झाली नाही.

बाबू कवळेकरांच्या कारवर कोसळले झाड
आल्तिनो-पणजी येथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारी निवासस्थानाजवळील रस्त्यावरील एक जुने झाड उन्मळून पडण्याची घटना काल घडली. ते झाड रस्त्याच्या बाजूला उभ्या करून ठेवलेल्या दोन कारवर पडल्याने त्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यापैकी एक कार ही माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या मालकीची आहे. कवळेकर यांनी नवी ईव्ही कार दोन दिवसांपूर्वीच खरेदी केली होती. कवळेकर हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठकीला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली.