26 C
Panjim
Tuesday, September 21, 2021

राज्यात एकाच दिवशी ४७ पॉझिटिव्ह

>> मांगूर हिलमध्ये कोरोनाबाधित ४२ रुग्ण

राज्यात एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह ४७ रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून मांगूर हिल वास्को भागात कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४२ रुग्ण काल आढळून आले असून मांगूर हिल भागातून आत्तापर्यंत ५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मडगावच्या कोरोना इस्पितळात ६९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुबईतून आलेले दोन प्रवासी, महाराष्ट्रातून आलेले दोन आणि बंगलोर येथून आलेल्या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

राज्यातील कोरोनो पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १२६ झाली असून त्यातील ५७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. बांबोळी येथील जीएमसीच्या कोरोना खास विभागात ३ कोरोना संशयितांना दाखल करण्यात आले आहेत. कोरोना खास विभागात एकूण १५ कोरोना संशयितांवर उपचार सुरू आहेत.

मांगूर हिल वास्को येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. मांगूर हिल भागातून आत्तापर्यंत ५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. या भागातील नागरिकांचे कोविड चाचणीसाठी स्वॅब घेऊन चाचणी करण्याचे काम सुरू आहे. मांगूर हिल येथे राहणारा कदंब महामंडळाचा एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांच्या संपर्कात असलेल्या कदंबच्या मडगाव डेपोमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी कोविड चाचणी करण्यास प्रारंभ केला आहे.

दोन खलाशी पॉझिटिव्ह
दुबई येथून खास विमानातून आलेले दोन खलाशी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने त्यांच्या संपर्कातील सर्वांची कोविड चाचणी केली जाणार आहे. सोमवारी दाबोळी विमानतळावर खास विमानातून १२३ प्रवासी आले. त्यांना पेड क्वारंटाईऩ केले आहे.

दोनापावलमध्ये तीन पॉझिटिव्ह
दोनापावलच्या एनआयओ वसाहतीमधील एक महिला आणि दोन वर्षाच्या मुलाच्या स्वॅबचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. ही महिला बंगलोर येथून आली होती. त्यांना मडगाव येथील कोविड इस्पितळात दाखल केली आहेत. तसेच, महाराष्ट्रातून रस्ता मार्गाने आलेल्या दोघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कोविड चाचणीत स्पष्ट झाले आहे.

वास्कोत लॉकडाऊन नाही ः मुख्यमंत्री
मांगूर हिल येथील कोरोना पॉझिटिव्ह वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर वास्को शहरात लॉकडाऊची शक्यता फेटाळली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांची बैठक घेऊन एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. मांगूर हिलबाहेर एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील ७५ जणांची चाचणी करण्यात आली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे वास्को शहरात लॉकडाऊनची गरज नाही. मांगूर हिल भागात कुणालाही प्रवेश करण्यास मान्यता दिली जात नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पहिला रुग्ण आंध्रप्रदेशातील ट्रक चालकाच्या संपर्कात
मांगूर हिल येथील मच्छिमारी कुंटुबातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आंध्रप्रदेशातील मासळीवाहू ट्रक चालकाच्या संपर्कात आल्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्त केली. मुरगाव तालुक्यात आरोग्य सर्वेक्षणाची सूचना करण्यात आली असून ताप, थंडीची लक्षणे असणार्‍या प्रत्येकाची कोविड चाचणी केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मांगूर हिलमधील कोरोना हा स्थानिक फैलाव ः मुख्यमंत्री

राज्यात कोरोना विषाणूचा सामाजिक फैलाव झालेला नाही. मांगूर हिल वास्को येथील कोरोना विषाणूचा फैलाव हा स्थानिक पातळीवरील आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला.

मांगूर हिल वास्को येथील एका कुटुंबाच्या चुकीमुळे कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. सदर कुटुंब कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत योग्य माहिती प्रशासनाला देत नाही. त्या कुटुंबाकडून कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत माहिती लपविली जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मांगूर हिल वास्को भागात सुमारे दोन हजार लोक राहतात. या सर्व लोकांची टप्प्याटप्प्याने कोविड तपासणी केली जाणार आहे. कोरोना विषाणूचा इतर भागात फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. येत्या चार ते पाच दिवसांत त्या भागातील सर्वांची कोविड चाचणी केली जाणार आहे. स्थानिक नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोविड तपासणीसाठी पुढे आले पाहिजे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

वास्को भागातील कोरोनाबाधित रुग्णांमुळे निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीचा अभ्यास करून वास्को शहरात लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मांगूर हिलमध्ये हेल्पलाईन
मांगूर हिल वास्को येथील भाग पूर्णपणे सील करण्यात आला असून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्यासाठी हेल्पलाईऩ सुरू करण्यात आली आहे. वैद्यकीय मदतीसाठी ८७६७११४८२५, अन्नपदार्थासाठी – ८७६७१०३९७६ हे खास क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत.

४२ जणांची चाचणी पॉझिटिव्ह
मांगूर हिल येथील प्रथम टप्प्यात घेण्यात आलेल्या सुमारे २०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात ४२ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या सर्व रुग्णांना इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले आहेत. त्यातील २ ते ३ कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत आहेत. तर इतर कोरोना बाधितांमध्ये कोरोना विषाणूची सौम्य लक्षणे आहेत. कोरोना विषाणू पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

खंवटे, सरदेसाईंचीही लॉकडाऊनची मागणी
वास्को शहर लॉकडाऊन करण्याची मागणी वाढत असून आमदार कार्लुस आल्मेदा यांच्यासह आमदार रोहन खंवटे व आमदार विजय सरदेसाई यांनीही वास्को लॉकडाऊन करावे अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर आता नागरिकही लॉकडाऊनची मागणी करत आहेत.

सीमा सील कराव्यात
दरम्यान, आमदार सरदेसाई यांनी, गोव्याच्या सीमाही बंद कराव्यात असे म्हटेल आहे. विदेशात अडकून पडलेल्या गोमंतकीयांना मोठ्या संख्येने सर्वांना एकत्रित आणणे टाळावे. सध्या एका दिवशी फक्त २ हजारांची चाचणी होऊ शकते. त्यामुळे विदेशातून त्यापेक्षा अधिक लोकांना आणणे टाळावे असे म्हटले आहे.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

‘आयपीएल’चा तडका आजपासून आखातात

सुधाकर रामचंद्र नाईक ‘कोविड-१९’च्या मृत्युतांडवामुळे आकस्मिकपणे अनिश्‍चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या बहुचर्चित तथा देश-विदेशांत अङ्गाट लोकप्रियता लाभलेल्या ‘इंडियन...

ताण, तणाव आणि आपण

गिरिजा मुरगोडी तुम्ही करत असलेल्या कामावर जर तुमचं प्रेम असेल आणि तुम्हाला माणसांची आवड असेल तर कुठलीच गोष्ट...

मुंगी ः एक किमयागार

अंजली आमोणकर नियमबद्धता, विचारी भाव, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी असावी हे मुंगी शिकवते. मुंगीचं जीवन मानवासाठी मोठा...

विमा उद्योगाचे खाजगीकरण

शशांक मो. गुळगुळे अलीकडे केंद्र सरकारकडून खाजगीकरणाबाबत बर्‍याच क्रांतिकारक घोषणा करण्यात आल्या. विरोधी पक्ष त्यांचे काम म्हणून याला...

कॅप्टन पदच्युत

राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची सध्या जी मालिका चालली आहे, त्यामध्ये भाजपने उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार केले, तर कॉंग्रेसने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन...

ALSO IN THIS SECTION

फडणवीस आजपासून गोवा दौर्‍यावर

>> निवडणूक सहप्रभारी रेड्डी व प्रभारी सी. टी. रवीही येणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते...

गोव्याला येत्या १९ डिसेंबरपूर्वी स्वयंपूर्ण बनवणार ः मुख्यमंत्री

>> ‘सरकार आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ येत्या १९ डिसेंबरपूर्वी म्हणजेच गोवा मुक्तिदिनाच्या ६० व्या वर्धापनदिनापूर्वी गोवा स्वयंपूर्ण बनवण्याचे उद्दिष्ट...

आजपासून ५० टक्के क्षमतेने कॅसिनो, मसाज पार्लर्स सुरू

>> सरकारचा आदेश जारी कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बंद असलेले कॅसिनो, स्पा, जलक्रीडा व जलसफरी, मसाज पार्लर्स, वॉटर पार्कस्,...

राज्यात सर्दी व तापाची साथ

>> लहान मुलांसह प्रौढांनाही बाधा राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असतानाच आता राज्यातील लहान मुलांसह प्रौढांमध्येही सर्दी व तापाची साथ...

माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुंबईत केले स्थानबद्ध

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौर्‍यावर निघण्याआधीच मुंबईत मुलुंड येथील निवासस्थानी स्थानबद्ध करण्यात आले. सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा...