राज्यात उद्यापासून पुन्हा पाऊस सक्रिय

0
109

येथील हवामान विभागाने येत्या गुरुवारपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता काल व्यक्त केली. हवामान विभागाने गुरुवार दि. 12 ते शनािर दि. 14 जून या तीन दिवसांसाठी राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्यात गेले आठ दिवस मोसमी पाऊस मंदावला आहे. राज्यात 1 जूनपासून नऊ दिवसात केवळ 3.78 इंच पावसाची नोंद झाली असून, पावसाचे प्रमाण 46.9 टक्के कमी आहे. जून महिन्याच्या सुरुवातीच्या पाच दिवसांत चांगल्या पावसाची नोंद झाली. त्यानंतर गेले काही दिवस पाऊस मंदावला आहे. येत्या गुरुवारपासून राज्यभरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय 15 आणि 16 जूनसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.