Home बातम्या राज्यात आतापर्यंत ९६.७८ इंच पाऊसपेडण्यात सर्वाधिक १२७ इंचांची नोंद

राज्यात आतापर्यंत ९६.७८ इंच पाऊसपेडण्यात सर्वाधिक १२७ इंचांची नोंद

0

आतापर्यंत राज्यात ९६.७८ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद पेडणे तालुक्यात झाली आहे. पेडण्यात आतापर्यंत १२७ इंच एवढा पाऊस झाला आहे.

पेडण्याप्रमाणेच साखळी, वाळपई, केपे व सांगे या ठिकाणी पावसाने शतक पूर्ण केले आहे. साखळी येथे आतापर्यंत १००.१८ इंच. वाळपई १११.७५ इंच. केपेत १०९.३३ इंच व सांगे येथे १०४.०९ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा व जुने गोवे येथेही पाऊस शतकाच्या उंबरठ्यावर आहे. म्हापशात आतापर्यंत ९७.५५ इंच एवढा पाऊस झाला आहे.

आतापर्यंत सर्वांत कमी पावसाची नोंद मडगाव येथे झाली असून ती ७८.२७ इंच एवढी आहे. त्या पाठोपाठ कमी पावसाची नोंद मुरगाव येथे झालेली असून ती ७९.३६ एवढी आहे. दाबोळी येथे ८०.२५ इंच, काणकोण येथे ८५.०६, पणजीत ८९.९४ इंच तर फोंड्यात ९१.४५ इंच एवढ्या पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. १ जून ते १६ ऑगस्ट या दरम्यान राज्यात ९६.७८ इंच एवढ्या पावसाची नोंद झालेली असली तरी याच काळात गतवर्षी पडलेल्या पावसापेक्षा हे प्रमाण एक टक्का अधिक आहे.

आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली असून समुद्रात ताशी ५५ ते ६५ कि.मी. एवढ्या वेगाने वारे वाहू शकतात, असे स्पष्ट केले आहे.