आज 2 जून व उद्या 3 जूनसाठी हवामान खात्याने राज्याला यलो अलर्ट दिलेला आहे. वरील काळात राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे, तर अन्य ठिकाणी पावसाच्या हलक्या किंवा मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. 4 जून ते 7 जूनपर्यंत हवामान खात्याने राज्याला ग्रीन अलर्ट दिलेला असून, वरील काळात राज्यात पावसाच्या मध्यम अथवा हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.