राज्यात आजपासून जोरदार पाऊस शक्य

0
10

उत्तर आंध्र प्रदेश व दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे मंगळवार दि. ९ ते गुरुवार दि. ११ ऑगस्टपर्यंत गोव्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या काळात दक्षिण गोवा तसेच उत्तर गोव्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. विशेष करून ११ ऑगस्ट रोजी, तसेच १२ ऑगस्ट रोजीही राज्यातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळासाठी हवामान खात्याने राज्याला पिवळ्या रंगाचा इशारा दिला आहे.