आग्नेय अरबी समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने काल हजेरी लावली. काणकोण, सांगे, मडगाव, कुडचडे, म्हापसा, पर्वरी, पेडणे, डिचोली आदी भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली. आकस्मिक पडलेल्या पावसामुळे दुचाकी वाहनचालक व नागरिकांची काहीवेळ गैरसोय झाली. अरबी समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे राज्यातील हवामानात दोन दिवसांपासून बदल झाला असून, उष्णतेत वाढ झाली आहे. आगामी चोवीस तासांत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

